Mahavitaran Apprentice Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची असू शकते, महावितरण छत्रपती संभाजी नगर मध्ये भरती सुरू झालेली आहे, या भरतीमध्ये एकूण 90 पदे भरण्यात येणार आहेत, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, ज्यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2025 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा व नंतर अर्ज करा.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Full Details
भरती विभाग : छत्रपती संभाजी नगर (महावितरण )
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी.
भरती श्रेणी : राज्यश्रेणीअंतर्गत हे भरती होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त झालेल्या उमेदवारांना छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र)मध्ये नोकरी मिळणार आहे
पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन ( वीजतंत्री )/ वायरमन ( तारतंत्री.)
एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 90 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण व ITI-NCVT( इलेक्ट्रिशियन / वायरमन ) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ (PDF) जाहिरात पहा.
मासिक वेतन : नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेगवेगळे वेतन मिळणार आहे, अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ(PDF) जाहिरात वाचा.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कसल्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाही.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण : महावितरण मंडळ कार्यालय,ग्रामीण छत्रपती संभाजी नगर, प्लॉट क्र. जे -13 गरवारे स्टेडियम समोर,MIDC चिखलठाणा येथे सादर करायची आहेत.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Online Apply
अधिकृत पिडीएफ जाहिरातसाठी : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा येथे क्लिक करा
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Full Details in English
Mahavitaran Apprentice Bharti 2025 : If you are looking for a job this news may be important for you, Mahavitaran Chhatrapati Sambhaji Nagar recruitment has started, total 90 posts are going to be filled in this recruitment, applications are invited from eligible and interested candidates through online mode, last date of application is 09 January 2025 , so interested candidates should apply as soon as possible. If you want to apply for this recruitment then the official pdf advertisement of this recruitment all the information like age limit educational qualification and pay scale and last date of application is given below. Candidates read the below information carefully and then apply.
Recruitment Department:
Chhatrapati Sambhaji Nagar (Mahavitaran)
Recruitment Type : Good chance to get Govt job.
Recruitment Category : This recruitment will be done under State category.
Job Location : To the appointed candidates
Job will be available in Chhatrapati Sambhaji Nagar (Maharashtra).
Post Name : Electrician / Wireman
Total Posts : Total 90 vacancies are being filled in this recruitment.
Required Educational Qualification : Candidates for this post must have passed 10th and ITI-NCVT (Electrician / Wireman).
Age Limit : For more information see below (PDF) advertisement.
Monthly Salary : Appointed candidates will get different salary as per rules, for more details read advertisement original PDF.
How to Apply : Candidates have to apply online.
Application Fee : No application fee of any kind will be charged for this recruitment.
Last Date to Apply : 09 January 2025 is the last date to apply.
Place of submission of documents : Mahavitran
Board Office, Rural Chhatrapati Sambhaji Nagar, Plot no. J-13 to be performed at MIDC Chikalthana, in front of Garware Stadium.
अधिक माहिती : मित्रांनो छत्रपती संभाजी नगर यांच्या सर्वेक्षण अहवालानुसार सण 2024-25 करिता प्रशिक्षणासाठी शिकवू उमेदवारांच्या वीजतंत्री -45 तारतंत्री – 45 अशा एकूण 90 जागा भरण्यासाठी वीजतंत्री / तारतंत्री या व्यवसायात आयटीआय (ITI)उत्तीर्ण झालेल्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन(online)प्रकारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27/12/2024 ते दिनांक 09/01/2025 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.gov.in या संकेत स्थळावर स्थापना क्र. E03182700117 वर ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करावेत. दिनांक 09/01/2025 नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
टीप : अर्ज करण्याची शेवटची तारीख 09/01/2025 रोजी सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत राहील. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
Home Guard Bharti 2025 : मुंबई मध्ये 2771 होम गार्ड पदांची भरती! असे करा अर्ज
मित्रांनो सदर भरती ही फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर कोणत्याही जिल्ह्यातल्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही किंवा त्यांचा विचार केला जाणार नाही, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.
ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रांची ( शैक्षणिक प्रमाणपत्र )आयटीआय(ITI) गुणपत्रक व सनद, एसएससी सनद (SSC) जातीचा दाखला, आधार कार्ड,रहिवासी दाखला इ.) साक्षांकित छायांकित प्रत दिनांक 09/01/2025 पर्यंत महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण छत्रपती संभाजी नगर,प्लॉट क्र. जे. 13 गरवारे स्टेडियम समोर, एमआयडीसी (MIDC) चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्यक्ष सादर करावी तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकित छायांकित प्रत सादर न करणाऱ्या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. तसेच या भरतीमध्ये उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा राहील. निवड झालेल्या शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण कालावधीत नियमाप्रमाणे विद्या वेतन अदा करण्यात येईल. शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास बदल करण्याचे सर्व अधिकार निम्न स्वाक्षरीकार यांना राहील.
टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.